विमान प्रवाशांना थोडाफार दिलासा... तिकीटाचे दर उतरले 

<p>विमान प्रवाशांना थोडाफार दिलासा... तिकीटाचे दर उतरले </p>

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून इंडिगो एअरलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. पुढील प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-पुणे या मार्गांवरील तिकीट दरासाठी तब्बल  ५० हजार ते १ लाख रुपये मोजावे लागत होते. परंतु इंडिगोला केंद्राकडून सूट मिळाल्याने परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे. लाखाच्या घरात गेलेले तिकीट दर पुन्हा ६ ते ७ हजारांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.