इंडोकाउंट फाउंडेशन क्षयरुग्णांचे आधारवड बनलंय : डॉ. हर्षला वेदक

<p>इंडोकाउंट फाउंडेशन क्षयरुग्णांचे आधारवड बनलंय : डॉ. हर्षला वेदक</p>

कोल्हापूर - प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इंडोकाउंट फाउंडेशनने निक्षय मित्र होऊन दिड वर्षात क्षयरुग्णांसाठी अकरा हजाराच्यावर पोषण आहार कीटची मदत केली आहे. याबद्दल नुकताच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी आरोग्य विभागामार्फत इंडोकाउंटचे संचालक कमल मित्रा यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना इंडोकाउंटचे संचालक कमल मित्रा यांनी, यापुढंही अशीच मदत करण्याचा संकल्प केला आहे.

या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी, इंडोकाउंट फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल कुमार जैन आणि संचालक कमल मित्रा यांनी इंडोकाउंट फाउंडेशनतर्फे केलेल्या मदतीमुळे क्षयरोग कार्यक्रमाला चालना मिळाली असल्याचे सांगितले. तसेच पोषण आहार कीट मिळाल्याने क्षयरुग्णांचे औषधोपचार मध्येच सोडण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले.