‘ही’ महापालिका निवडणुकीच्या कामाला नकार देणा-या कर्मचा-यांना पाठवणार नोटीस...

<p>‘ही’ महापालिका निवडणुकीच्या कामाला नकार देणा-या कर्मचा-यांना पाठवणार नोटीस...</p>

मुंबई –  देशासह राज्यातील निवडणुकींचे कामकाज करण्यासाठी शिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाला लावले जाते. या कामावर अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी, निवडणुकीची कामं करण्यास नकार देणा-या कर्मचा-यांना नोटीस द्यावी, असा आदेश काढला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामास नकार देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भांतील विविध कामे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून निवडणुकीच्या कामाचे आदेश हाती पडताच महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होतेय. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी कर्मचाऱ्यांसाठी विशेष नोटिसीचा आदेश दिला आहे.