मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत काँग्रेसने जाहीर केली आपली भूमिका
मुंबई – राज्यातील पहिल्या टप्प्यात नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतर निवडणुकींबाबत पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस एकला चलो रे च्या भूमिकेत दिसणार आहे.