इचलकरंजीतील तरुणाची कागल तालुक्यातील अंजनी गावात निघृण हत्या...

 

मेहणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तरूणाला संपवले

<p>इचलकरंजीतील तरुणाची कागल तालुक्यातील अंजनी गावात निघृण हत्या...</p>

<p> </p>

इचलकरंजी – इचलकरंजी शहरातील तरुणाची कागल तालुक्यातील अंजनी गावात निघृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी शहरातील एका गाड्यांच्या शोरुम मध्ये सुहास सतीश थोरात हा काम करत होता. दुचाकी दुरूस्त करायची आहे असे सांगून त्याला संशयित अमर शिंदे, पृथ्वी चेचर आणि ओंकार कुंभार हे जबरदस्तीने घेवून गेले याबाबतची माहिती मिळताच सुहासच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याचे वडील सतिश बळीराम थोरात यांनी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जलद गतीने तपास सुरू केला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कागल तालुक्यातील मुरगूड जवळ असलेल्या अंजनी गावात सुहास याची एका ओढ्यात निघृण हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास पथके तैनात करून आज पहाटेच्या सुमारास इचलकरंजीतील ओंकार अमर शिंदे, पृथ्वी चेचर, आणि ओंकार कुंभार या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी अमर शिंदे याच्या मेहणीचे आणि सुहास थोरात याचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून अमर शिंदे याने आपल्या सहकाऱ्यांसोबत हत्या केल्याची कबुली दिली आहे.

 दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी संशयित आरोपी शिंदे याला सोबत घेऊन ठिकाणचा पंचनामा केला.