सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कोल्हापूर - कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष अॅड. रणजीत कवाळे यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी अॅड. सुनील धुमाळ, अॅड. गिरीश नाईक, अॅड. राहुल सडोलीकर, अॅड. प्रवीण पाटील , अॅड. प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.