देशातील ‘हे’ राज्य ठरलं ‘गरिबीमुक्त’...मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा 

<p>देशातील ‘हे’ राज्य ठरलं ‘गरिबीमुक्त’...मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा </p>

तिरुअनंतपुरम - गरिबी दूर करण्यासाठी 2021 मध्ये केरळ राज्याने अत्यंत गरिबी निर्मूलन प्रकल्प सुरू केला होता आणि त्या प्रकल्पाला यश आले आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी, विधानसभेत औपचारिकपणे राज्य अत्यंत गरिबीमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केरळ हे पहिले राज्य गरिबीमुक्त ठरले आहे.
मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले की, 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह, राज्य सरकारने अत्यंत गरिबीने ग्रस्त कुटुंबांना दररोज अन्न, आरोग्यसेवा, घरे, रेशन कार्ड, आधार कार्ड, पेन्शन यासारखी आवश्यक कागदपत्रे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने पिनारायी सरकारच्या दाव्यांना फसवे म्हटले आहे. सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे.