आंध्रप्रदेशात पुन्हा चेंगराचेंगरी... नऊ जणांचा मृत्यू
बंगळूरू – आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात भाविकांची मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये नऊ भक्तांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी तमिळनाडू आणि बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. असं असताना पुन्हा चेंगराचेंगरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी (शनिवारी) एकादशीच्या मुहूर्तावर अनेक भाविकांनी वेंकटेश्वर मंदिरात मोठी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेनंतर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.