तुलसी विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील बाजारपेठा पूजेच्या साहित्यानं सजल्या
कोल्हापूर - दीपोत्सवाच्या सणाची सांगता करणारा तुलसी विवाह सोहळा उद्या सर्वत्र मोठ्या साजरा केला जाणाराय. या पार्श्वभूमीवर आज शहरातील बाजारपेठा पूजेच्या साहित्यानं सजल्या होत्या. पूजा साहित्यासह अन्य साहित्य खरेदीसाठी लोकांची बाजारपेठत गर्दी दिसत होती.
दिवाळीच्या सणाची सांगता तुलसी विवाह सोहळ्यानं होते. उद्या रविवारी सर्वत्र तुलसी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तुलसी विवाह सोहळ्यासाठी लागणारं पूजेचं साहित्य तसंच अन्य साहित्यानं बाजारपेठ सजलीय. झेंडूची फुलं ,ऊस,केळी,फळे यासह पणत्या, रांगोळ्या यांचे स्टॉल्स बाजारपेठेत लागलेत.अनेक ठिकाणी तुलसी वृंदावन रंगरंगोटीचं काम सुरू होतं. आज दिवसभर तुलसी विवाह सोहळ्याचं साहित्य खरेदीसाठी लोकांची बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळली. अंबाबाई मंदिर परिसर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, राजारामपुरी जनता बाजार चौक आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरात पूजा साहित्याचे स्टॉल्स मोठ्या संख्येनं लागल्याचं पहायला मिळालं