'माहेरची साडी' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन होत्या मुख्य भूमिकेत पण...

24 September 2023, 02:06:54 PM Share
मुंबई – तब्बल बत्तीस वर्षांपूर्वी (1991 मध्ये) अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता अजिंक्य देव, अभिनेत्री उषा नाडकर्णी, रमेश भाटकर, विक्रम गोखले, आशालता बावगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा 'माहेरची साडी' सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी त्यावेळी चांगलच उचलून धरलं होतं. आजही हा सिनेमा लागला की, महिलांच्या डोळ्यातील अश्रू काही  थांबत नाहीत. परंतु 'माहेरची साडी’ सिनेमा अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांना मिळाला होता त्या या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार होत्या पण त्यांनी हा सिनेमा नाकारला. त्यामुळे अभिनेत्री अलका कुबल यांना ही भूमिका मिळाली.

१९९१ मध्ये या सिनेमात काम करण्यास अभिनेत्री अलका कुबल यांनीही मानधनाच्या कारणास्तव साफ नकार दिला होता पण दिग्दर्शक विजय कोंडगे यांच्या इच्छेखातर  त्यांनी काम करण्यास होकार दिला आणि 'माहेरची साडी’ सिनेमा त्यावेळी सुपरडुपर हिट ठरला.

संबंधित लेख