पंतप्रधान म्हणतात, मी केलं, मी बनवलं. पण देश एका व्यक्तीने नाही तर...: मल्लिकार्जुन खरगे
नवी दिल्ली – "पंतप्रधान नेहमी म्हणतात, मी केलं, मी बनवलं. पण देश एका व्यक्तीने नाही तर सर्वांच्या प्रयत्नांनी चालतो. पंतप्रधान आणि नेते येतात-जातात, पण देश टिकवून ठेवतात ते लोक आणि लोकशाही, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ''मोदी साहेबांना ‘मी केलं’ म्हणायची सवय आहे. ठीक आहे, नोटबंदी केलीत, पण त्याचा परिणाम काय झाला? दोन कोटी नोकऱ्या देण्याचं वचन दिलं, पण आजही तरुण बेरोजगार आहेत''