...तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही : बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा
नागपूर - जोपर्यंत कर्जाचा हप्ता थेट बँकेत जमा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. थोडी जरी इकडे-तिकडे नजर केली, तर खबरदार, आम्ही येथे उभे आहोत, आम्ही जिवंत आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले की, सरकार "योग्य वेळेची" वाट पाहत होते, मात्र सर्व शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ती वेळ आत्ताच आणली, हे सर्वात मोठे यश आहे. सरकार कर्जमाफीच्या घोषणेपासून पळत होते, पण आम्ही बळाचा वापर करून त्यांना तारीख देण्यास भाग पाडले. आंदोलनकर्त्यांच्या एकजुटीमुळेच कर्जमाफीची तारीख खेचून आणली. गरज पडल्यास पुन्हा नागपूरमध्ये ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.