‘मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की...’: उपमुख्यमंत्री अजित पवार

<p>‘मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की...’: उपमुख्यमंत्री अजित पवार</p>

मुंबई – सोलापुरातील महिला आयपीएस अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करून स्प्ष्टीकरण दिले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे कि, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.”