गणवेश परिधान न करणाऱ्या आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर दंडात्मक कारवाई

<p>गणवेश परिधान न करणाऱ्या आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर दंडात्मक कारवाई</p>

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, सर्व आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, मुकादम व सफाई कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत निर्धारित गणवेश परिधान करणे अनिवार्य केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून (१ नोव्हेंबर २०२५) सुरू करण्यात आली. तपासणीदरम्यान काही अधिकारी आणि कर्मचारी गणवेशाशिवाय असल्याचे आढळले. प्रशासनाच्या आदेशानुसार खालील कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 


➡️आरोग्य निरीक्षक: श्रीराज होळकर, ऋषिकेश सरनाईक, महेश भोसले, विकास भोसले, मुनिर फरास
➡️सहाय्यक आरोग्य निरीक्षक: अनिकेत सुर्यवंशी, सूरज घुणकीकर, विनोद नाईक, श्रीमती शर्वरी कांबळे
➡️मुकादम: तानाजी भोसले

वरील सर्वांकडून मिळून एकूण ₹10,800/- दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, पाच मुकादमांनी भागातील कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ताडपदरीने झाकून न नेताच ओपन झूम प्रकल्पावर पाठविल्यामुळे, त्यांनाही प्रत्येकी 500/- रुपये प्रमाणे दंड करण्यात आला आहे.