टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना सेवा देता येणार नाही : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

<p>टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना सेवा देता येणार नाही : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय </p>

नवी दिल्ली -  टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय माध्यमिक शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांना सेवा देता येणार नसल्याचा निर्णय  सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना धक्का बसला आहे. 

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकविणारा कोणताही शिक्षक टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय सेवेत राहू शकत नाही किंवा पदोन्नतीही मिळवू शकत नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बालशिक्षण हक्क कायदा २००९ पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटीतून वगळले आहे. मात्र हजारो शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. अन्यथा सदर शिक्षकांना सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.