मुंबईची सुरक्षा वाढवली... 'मानवी बॉम्ब' ठेवल्याची धमकी 

<p>मुंबईची सुरक्षा वाढवली... 'मानवी बॉम्ब' ठेवल्याची धमकी </p>

मुंबई – अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईमध्ये खूप गर्दी असते याच गर्दीचा फायदा घेत मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला व्हॉट्सॲपवर धमकीचा संदेश देण्यात आला आहे. शहरातील ३४ वाहनांमध्ये ३४ 'मानवी बॉम्ब' ठेवण्यात आल्याचं म्हटलय.या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई हादरून जाईल, असंही म्हटले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबई शहराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या धमकीबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ही धमकी खोटी असल्याचं प्राथमिक चौकशी दरम्यान सांगण्यात आले आहे.