कोपार्डे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन
एफ.आर.पी. दर जाहीर न झाल्याने ऊस उत्पादक संतप्त; ट्रॅक्टरसमोर झोपून निषेध
कोपार्डे : करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील लक्ष्मी टेकडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले. ऊसाच्या एफ.आर.पी. दराबाबत अन्याय होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसमोर झोपून निषेध व्यक्त केला. जोपर्यंत योग्य एफ.आर.पी. दर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत ट्रॅक्टर हलविणार नाही, असा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
दत्त दालमिया साखर कारखान्याने चालू हंगामात एफ.आर.पी. दर ३६४२ रुपये प्रति टन असताना ३५२५ रुपये इतका दर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन ११७ रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे. हा फरक तत्काळ भरून द्यावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी, दत्त दालमिया साखर कारखान्याने न्यायालयाचा अवमान केला असून, या संदर्भात उद्या संबंधित कारखान्यावर याचिका दाखल केली जाणार आहे.